सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर २३ परिसरातील श्रमिकांच्या सौजन्य को.ऑप. हौ. सोसायटीमधील अंर्तगत भागात महापालिका प्रशासनाकडून पथदिवे तसेच छोटेखानी हायमस्ट लावण्याची मागणी समाजसेविका व भाजपच्या कार्यकर्त्या सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे, सेक्टर २३ परिसरात कंडोमिनियम प्लॉट नं. अे-२ येथे सौजन्य को.ऑप. हौ. सोसायटी आहे. ही सोसायटी पूर्णपणे एलआयजी टाईप असून येथे अल्प उत्पन्न गटातील श्रमिकांचे वास्तव्य आहे. महापालिका प्र्रशासनाकडून या सोसायटीच्या अंर्तगत भागात पथदिव्यांची उभारणी करून वीज व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. आजिमतीला सोसायटीच्या अंर्तगत भागात ठिकठिकाणी वीज दिवे नामधारी बनले असून सर्वच बंद पडले आहेत. विद्युत केबल्सही सडल्या आहेत. आपण स्वत: या ठिकाणी पाहणी केल्यास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल, असे सुनिता हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या श्रमिकांच्या सोसायटीत सांयकाळनंतर पूर्णपणे अंधार पसरत असून या अंधाराचा फायदा घेवून चोऱ्या होण्याची अथवा महिलांशी-मुलींशी छेडछाड होण्याचीही भीती आहे. या सोसायटी आवारात ठिकठिकाणी पथदिवे तसेच मोकळ्या सार्वजनिक जागेत हायमस्ट लवकरात लवकर बसवून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. या ठिकाणी हायमस्ट तसेच पथदिवे बसल्यास चोरीची व इतर समस्या निर्माण होणार नसल्याचे सुनिता हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.