सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई जिल्हा सदस्य आणि पाल्म बीच रेसिडेंसी, नेरुळचे अध्यक्ष सुनिल कृष्णा सुतार यांनी महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन पाल्म बिच रेसिडेंसी, नेरुळ येथे राहणाऱ्या रहिवासी यांची महानगर पालिकेच्या वतीने मास स्क्रिनिंग शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे यासाठी निवेदन दिले. पाल्म बिच रेसिडेंसीमध्ये ६१४ सदनिका असून त्यात जवळपास तीन हजार नागरिक राहत आहे.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महानगर पालिका रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात अत्यावश्यक आय सी यु बेड आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावे. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात मोफत कोव्हीड अँटीजन टेस्ट करावी.जेणे करून नागरिकांचा लवकरात लवकर अहवाल येवून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येईल. लॉकडाऊनमुळे नवी मुंबईतील विविध उद्योगधंदे बंद आहेत. यामध्ये जिम देखील बंद आहे. शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे (उदाहरण नेहमी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मोठ्या संख्येने गर्दी न करता ) या अटीनुसार जिम चालू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी देखील मागणी सुनिल सुतार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.