
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार, नवी मुंबईचे विकासपर्व आणि त्यागमूर्ती संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ प्रभाग ९६ मध्ये मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले.
४ ऑगस्ट हा नवी मुंबईचे विकासपर्व आणि त्यागमूर्ती संदीप नाईकांचा वाढदिवस. त्यागमूर्ती संदीप नाईकांचे पर्यावरणप्रेम व वृक्षसंवर्धनाची आवड जगजाहिर आहे. ग्रीन होपच्या माध्यमातून हरित नवी मुंबई करण्यात संदीप नाईकांचे योगदान कोणीही नाकारणार नाही. प्रभाग ९६ मधील भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर २४ परिसरातील बामणदेव व झोटींगदेव मैदानावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजसेवक संजय पाथरे, अक्षय पाटील, सुरेश नलावड़े, अशोक गांडाल, रुणाल सुर्वे, रविंद्र भगत उपस्थित होते.