
नवी मुंबई : माजी आमदार संदीप गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी,ऐरोली, प्रभाग क्र २२मध्ये संदीप नाईक यांचे जवळचे सहकारी आणि समाजसेवक राजेश गजानन मढवी आणि समाजसेविका रेश्मा राजेश मढवी यांच्या वतीने दिवा गावातील २० कोरोना योद्धा मोरेश्वर केणी, फूलचंद पाटील, सारंग मढवी , जयेश पाटील, भाई केणी, पुष्पराज केणी, निलेश पाटील, किरण मढवी, ऋषीकांत पाटील, विकास रावत, सूर्यकांत शिंदे, विपुल कांबळे यांना मोफत प्रत्येकी १००००० (एक लाख रुपयांची ) star health corona insurance policy चे वितरण करण्यात आले . तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले.कोरोना काळात स्वतःचे जीव धोक्यात घालून प्रभागातील नागरिकांना मदत करणाऱ्या कोरोना योद्धांचे सन्मानदेखील करण्यात आले. या प्रसंगी समाजसेवक दिपक पाटील, चिंतामणि केणी, भरत मढवी, महेश मढवी, हरीचंद्र मढवी, अरुण पडते, निलेश जीवन पाटील, बलिराम पाटील, संतोष पाटील, रविंद्र केणी, राजू पाटील, मिलिंद ताम्हनकर, नितिन देसाई, विनोद जहांगीरदार, संदीप शेट्टी, किरण कदम, शानू नाटेकर, डॅनीयल वाघमारे, हेमंत माने, अक्षय गवळी, रविंद्र चव्हाण, अनंत कामत उपस्थित होते.