सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोरोना संकटात लॉकडाऊनच्या काळात अनेक राजकारण्यांनी नवी मुंबईकरांना सुरूवातीच्या काळात मदतीचा हात पुढे केला. सोशल मिडियावर मदतीची चमकेशगिरीही झाली. पण कोरोनाचा कालावधी वाढत गेल्यावर समाजसेवेच्या नावाखाली चमकोगिरी करणारी मंडळी आपल्या घरातच बंद झाली. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यत स्माईल्स फॉऊंडेंशन व आहूजा दांपत्याने आपले जनसेवेचे व तळागाळातील मदतीचे कार्य कोणतीही चमकेशगिरी न करता अखंडपणे सुरूच ठेवले आहे. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी नवी मुंबई पोलिसांना स्माईल्स फांऊडेशनच्या वतीने आहूजा दांमपत्याने एकीकडे रेनकोटची भेट दिली तर दुसरीकडे नेरूळमधील गरजू टॅक्सीचालकांना धान्याच्या किटची मदत केली.
नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात कोरोना काळात स्माईल्स फांऊडेशनच्या माध्यमातून धीरज आहूजा व उमा आहूजा या पती-पत्नीने गरजूंना मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची मदत केली आहे. विविध राजकीय घटकांनी स्माईल्स फांऊडेशनकडूनच धान्य घेवून स्वत:च्या परिसरात वितरीत केलेले नवी मुंबईलकरांनी जवळून पाहिले आहे. ७ ऑगस्ट रोजी नेरूळ पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना धीरज आहूजा व उमा आहूजा यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटची स्माईल्स फांऊडेशनच्या वतीने भेट दिली. सुमारे ३०० रेनकोटची भेट आहूजा यांनी नवी मुंबई पोलिसांना दिली.
रेनकोट दिल्यानंतर नेरूळ पूर्वेकडील सेक्टर ११ येथील न्यू बॉम्बे टॅक्सी स्टॅण्ड येथे १५० टॅक्सीचालकांना धान्याच्या किटचे वाटप स्माईल्स फांऊडेशनच्या वतीने नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते वितरीत केले. या किटमध्ये ३ किलो तांदूळ, डाळ १ किलो व ड्रिकींग पावडरच्या डब्याचा समावेश आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्यासह हेमंत लेंढघर, रोहीदास हाडवळे, शंकर चौधरी, प्रमोद शेळके उपस्थित होते.