गणेश पालवे
नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आगरी-कोळ्याच्या त्यागावर निर्माण झालेल्या नवी मुंबई शहरात प्लाझ्मा डोनेशनला आता सुरूवात झाली असून या आगरी-कोळ्याच्या व नव्याने आलेल्या कॉलनीवासियांच्या शहरात प्लाझ्मा डोनेट करण्याचा मान नेरूळ गावातील देवनाथ म्हात्रे व प्रेमनाथ म्हात्रे या आगरी बंधूंनी मिळविला आहे.
कोरोना आजारावर उपचाराखातर प्लाझमा थेरपी ही अत्यंत गुणकारी ठरत आहे.त्याअनुषंगाने कोरोना रुग्णांचे प्राण वाचावे या उद्देशाने माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेरूळ गावातील सामाजिक कार्यकर्ते देवनाथ म्हात्रे व प्रेमनाथ म्हात्रे या बंधूनी प्लाझमा पेशी दान केले.
नवी मुंबईत सध्या कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर बाजारात अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत लस निघाली नसताना प्लाझमा थेरपी ही अत्यंत गुणकारी ठरत आहे.त्या अनुषंगाने कोरोना रुग्णांचे प्राण वाचावे या उद्देशाने नेरुळ मधील सामाजिक कार्यकर्ते देवनाथ म्हात्रे व प्रेमनाथ म्हात्रे या बंधूनी माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेरुळ मधील ऑपलो हॉस्पिटलमध्ये प्लाझमा दान केले.
दरवर्षी म्हात्रे बंधूकडून ऐरोलीचे प्रथम आमदार, नवी मुंबईचे विकासपर्व व त्यागमूर्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रसिध्द असणाऱ्या संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाची महामारी पाहता प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन देवनाथ म्हात्रे यांनी केले आहे.