
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी जावून रहीवाशांची अॅण्टीजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभाग ४२ कोपरखैराणे नोडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न स्तुत्य आहे. कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, रो-हाऊसेस, माथाडी वसाहतीमध्ये घरोघरी जावून महापालिका प्रशासनाने ‘अॅण्टीजेन टेस्ट’ सुरू करणे आवश्यक आहे. आपण प्रभाग ४२ मध्ये कोरोना संपुष्ठात आणण्यासाठी लवकरात लवकर संबंधितांना मोहीम राबविण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी भाजप कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.