• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 12, 2020

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते नवचंडी होम पूजेचे आयोजन

adminbyadmin
in Uncategorized
0
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते नवचंडी होम पूजेचे आयोजन

सुवर्णा खांडगेपाटील

गोकुळाष्टमी निमित्त श्री गोवर्धनी माता मंदिराच्या १३व्या वर्धापनदिनाचे औचित्य  

नवी मुंबई : सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमी निमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या १३व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे  आयोजन करण्यात आले होते. सदर होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत व्हावे व ज्या आर्थिक संकटाना नागरिक सामोरे जात आहेत ते संकट दूर होऊन सर्व काही पूर्व पदावर येऊन सुख, शांती आणि समृद्ध जीवन सर्वांना लाभो अशी प्रार्थना  आज गोवर्धनी मातेला नवचंडी होमानिमित्त केली असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणजे श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी आख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री गोवर्धनी आईची जनमानसात ख्याती आहे. श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार १३ वर्षांपूर्वी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते गोकुळाष्टमीच्या दिवशी करण्यात आला होता. दरवर्षी गोकुळ अष्टमीच्या दिवशी यथोचित पूजा अर्चा व उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव साधेपणाने, सामाजिक अंतर ठेवून केवळ पुजाऱ्यांसमवेत साजरा केला गेला.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे नेरुळ येथे ‘डफली बजाओ’ आंदोलन

Next Post

मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ!: सत्यजीत तांबे

Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा : सत्यजीत तांबे

मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ!: सत्यजीत तांबे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

पालिकेचा दणका: अवाजवी बिलप्रकरणी १० खासगी रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीसा

सारसोळेच्या संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले

सारसोळेच्या संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com