• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 12, 2020

पालिकेचा दणका: अवाजवी बिलप्रकरणी १० खासगी रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीसा

adminbyadmin
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

नवी मुंबई : काही खासगी रूग्णालयांकडून रूग्णांवर उपचार केल्यानंतर अवाजवी बिलाची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महापालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आज नियुक्त केलेल्या समितीने देयकांच्या पडताळणीमध्ये दोष आढळल्याचे समोर आल्याने १० खासगी रूग्णालयांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीसा बजावल्याने खळबळ उडाली आहे.

खासगी रूग्णालयाकडून कोणत्याही रूग्णाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे अथवा देयक रक्कमेमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आल्यास त्या रूग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने या १० रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाठवल्या आहेत.

नवी मुंबईतील एकाही रूग्णाची आर्थिक फसवणूक होऊ नये. खासगी व धर्मादाय रूग्णालयांना तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जावेत व त्या उपचारांसाठी खासगी रूग्णालयांकडून २१ मे रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक बाबींसाठी निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावे याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. या आदेशामध्ये वैद्यकीय उपचार, सुविधा व देयक अशा सर्व बाबींवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून रूग्णालयनिहाय नियुक्त केलेल्या पालिकेच्या नोडल अधिकारी यांनी त्याबाबतच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देशित दिले आहे.

त्यापूर्वीही पालिकेच्या वतीने खासगी रूग्णालयांना २१ मे च्या शासन अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारण्यात यावी असे सूचित केले होते. मात्र वाजवी शुल्क आकारण्या ऐवजी अवाजवी शुल्क रूग्णालयांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापण करण्यात आल्या होत्या. या समितीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रथमदर्शनी पडताळणीमध्ये १० खासगी रूग्णालयांनी केलेल्या देयकांच्यात दोष आढळले आहेत. त्याकारणाने या १० रूग्णालयांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे व मृत्यू दर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून कोरोना रूग्णांवरील उपचारांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. निश्चित केलेल्या दरांनेच खाजगी रूग्णालयांनी उपचार करणे बंधनकारक असल्याने त्याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयातील देयकाबाबत कोणत्याही नागरिकाची काही तक्रार असल्यास अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रूग्णालय देयकांबाबतच्या विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीकडे लेखी तक्रार करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. जेणेकरून सदर तक्रारीचे निराकरण २४ तासात करणे शक्य होईल.

Previous Post

मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ!: सत्यजीत तांबे

Next Post

सारसोळेच्या संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले

Next Post
सारसोळेच्या संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले

सारसोळेच्या संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा : सत्यजीत तांबे

पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!: सत्यजीत तांबे

भाजप आमदाराच्या घरापुढे युवक कॉंग्रेसचे आंदोलन

भाजप आमदाराच्या घरापुढे युवक कॉंग्रेसचे आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com