
नवी मुंबई : बेलापुर येथील भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या बेलापुर येथील निवासस्थानासमोर नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळात व अन्य समस्यांचा सामना करण्यासाठी केंद्राकडून २० लाख करोडचे पॅकेज जाहीर करण्यात आले. तथापि या घोषणेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून न झाल्याने राज्यभरात युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या बंगल्यासमोर आंदोललन करताना नवी मुंबईत युवक कॉंग्रेसने या आंदोलनाचा शुभारंभ केला.
या आंदोलनात नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, युवक कॉग्रेसचे बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणिस डॉ. विुनोद बाबुशेठ पाटील, डॉ. विजय बाबूशेठ पाटील, पंकज जगताप, विजय पवार, किरण बोडके, सोहेल शेख आदी युवक कॉग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. हे आंदोलन शांततेत कररण्यात आले.