• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 17, 2020

संपूर्ण वेळ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीला यश

adminbyadmin
in Uncategorized
0
आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने व मॉल्स हे संपूर्ण वेळ खुली ठेवण्याबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, माजी सभापती संपत शेवाळे, व्यापारी अध्यक्ष प्रमोद जोशी अशा शिष्टमंडळासह तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे मागणी केली होती. तदनंतर आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडेही सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला व सततच्या पाठपुराव्याला यश आले असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्याबाबतचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मान्यतेने आदेश काढले आहेत. सदरबाबतचे पत्र त्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांना दिले आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व व्यापारी वर्गातून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले जात आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन नुसार हद्दीतील दुकानांना सम विषम तारखेला परवानगी देण्यात आली होती. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे नियमित  व्यवसाय करण्यास मुभा देण्याची तसेच संपूर्ण वेळ दुकाने खुली ठेवण्याबाबतची लेखी मागणी भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली होती.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेमार्फत लॉकडाऊन जाहिर झाला. टाळेबंदीमुळे दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होते. त्याचे  उद्योजक व व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊनचे नियम जाहिर करताना सम-विषम तारखेप्रमाणे छोटया-मोठया व्यापाऱ्यांची दुकाने सुरू ठेवलेली होती. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून महापालिका हद्दीतील छोटया-मोठया उद्योगधंद्यांना देखील दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी अशी संपूर्ण नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ तसेच आयुक्त अभिजीत बांगर यांजकडे सातत्याने केली होती. व्यावसायिक व व्यापाऱ्यांची मागणी ही रास्त असल्याने व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह आयुक्तांची भेटही घेतली होती. आयुक्तांनीही सदरबाबत सकारात्मक दाखवीत शनिवार दिनांक १५ ऑगस्टपासून दोन्ही बाजूचे दुकाने नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी गर्दी टाळणे तसेच सामाजिक अंतर पाळणे याशिवाय इतर नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी त्याचे पालन करणे अनिवार्य आहे.

Previous Post

केशरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना महापालिकेकडून धान्य देण्याची मागणी

Next Post

देयकाचा भरणा करण्यासाठी गुगल पे, फोन पे, पेटियम आदि माध्यमाचा वापर करू द्या

Next Post
देयकाचा भरणा करण्यासाठी गुगल पे, फोन पे, पेटियम आदि माध्यमाचा वापर करू द्या

देयकाचा भरणा करण्यासाठी गुगल पे, फोन पे, पेटियम आदि माध्यमाचा वापर करू द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा पुन्हा सुरू करा

मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या :  अशोक गावडे

मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या : अशोक गावडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com