
शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवेंची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे नेरूळ पश्चिमचे विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून महापालिका प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ परिसरातील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर व पाणी देयक भरणा स्विकारला जात होता. स्थानिक रहीवाशांसह सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांची यामुळे गैरसोय टाळली जात असे. लॉकडाऊननंतर या सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा पालिका प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रहीवाशांकडून पुन्हा गैरसोय वाढीस लागली आहे. स्थानिक जनतेला व सभोवतालच्या परिसरातील जनतेला पाणी देयक व मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिका विभाग अधिकारी कार्यालयात जावे लागते. आता कोरोना पर्व कमी व्हायला लागले आहे. सर्वत्र नियम शिथील व्हायला लागले आहे. स्थानिक जनतेची भरणा करण्यासाठी होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी समस्येचे गांभीर्य पाहता लवकरात लवकर नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी केली आहे.