
नवी मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या वतीने डॉ. विजय बाबूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी वृक्षारोपण व वृक्ष रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस बेलापूर विधान मतदारसंघ डॉ. विनोद बाबूशेठ पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय बाबूशेठ पाटील, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पंकज जगताप, सरचिटणीस बेलापूर विधानसभा मतदारसंघ विजय पवार, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सचिव विद्या भांडेकर, सुदर्शन सावंत (NSUl), सोहेल शेख आदी उपस्थित होते.