
नवी मुंबई : भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त नवीमुंबई जिल्हा कॉग्रेस कमिटी, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अन्वर हवलदार यांच्या वतीने नेरूळ सेक्टर 23 येथे धान्य कीट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रभागातील 100 गरीब परिवारामध्ये किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी इर्फान काजी , जामा मस्जिदचे अध्यक्ष कुरेश सिद्दीकी, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत, डॉ. विजय पाटील, विनोद पाटील, कॅप्टन सरवर पाटणकर, आसिफ कुमादन, मुश्ताक काजी, नसीरभाई, हुसेनभाई, अज़ीम पठान, परवीन शाह, अमान हसोलकर , अनीस खान कार्यक्रमात उपस्थित होते.
धान्य कीट साठी नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी 100 पाम तेल बॅगचे सहकार्य केले.