
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण -२०२० भारत देशात तीसरा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नवी मुंबई शहरातील साफ सफाई चांगली व्हावी यासाठी रस्त्यावर उतरून जीवाचे रान करणाऱ्या साफ सफाई कामगारांचा शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी जनसेवक गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका रुपाली किसमत भगत यांच्या वतीने प्रत्येकी एक छत्री आणि सॅनिटायझर बॉटल देवून सत्कार करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व विभागातील सफाई कर्मचारी, सर्व सफाई कामगार आपल्या नवी मुंबई शहरातील मार्केट, गार्डन, मैदान टॉयलेट, फुटपाथ, तसेच रस्त्याची साफसफाई चांगली व्हावी यासाठी जीवाचे रान करीत होते. नवी मुंबईतील नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी समजून स्वछतेच्या नियमांचे पालन करून नवी मुंबई शहर स्वच्छ ठेवायला हातभार लावला. त्यामुळे आज नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात तीसरा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक भेटला असल्याचे गणेश भगत यांनी सांगितले
यावेळी गणेश भगत यांनी स्वछता पुरस्काराचे सर्व श्रेय महापालिका अधिकारी वर्ग, साफ सफाई कामगार, सर्व नागरिक आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना दिले आणि त्यां सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि जाहिर आभार मानले. यावेळी समाजसेवक अशोक गांडाल, सागर मोहिते, जयेंद्र मढ़वी, रविंद्र भगत उपस्थित होते.