
सुवर्णा खांडगेपाटील
- कांतीलाल कडू यांना दिलेले ‘वचन’ डॉक्टरांनी पाळले!
पनवेल : खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या नॉन कोविड रुग्णाला सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्यामुळे तब्बल ६३ हजारांची घसघशीत सूट मिळाली आहे. डॉ. मनोज वर्मा यांनी देयकात सूट देवून रुग्णांचे जीवन सुगंधित केले असल्याची भावना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार वचन गायकवाड यांच्याकडे नॉन कोविड रुग्ण सुगंधी यादव यांच्या नातेवाईकांनी कैफियत मांडली होती. सहा दिवसात हॉस्पिटल, औषधांचे पावणे दोन लाख रूपये बिल आकारल्याने गरीब रुग्णाला बिलाची रक्कम देणे परवडत नव्हते. गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधला. वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर कडू यांच्या सुचनेनुसार गायकवाड स्वतः हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांशी बोलले. त्यानंतर कडू यांच्याशी संवाद साधून दिला.
अष्टविनायक हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर मनोज वर्मा यांनी कडू यांच्याशी अतिशय नम्रपणे संवाद साधताना, आपण सांगाल तितकेच बिल आकारले जाईल असे सांगितले. त्यानंतर कडू यांनी पुन्हा गायकवाड यांच्याशी बोलून साठ-सत्तर हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल असा अंदाज व्यक्त केला.
डॉक्टरांनी कडू आणि गायकवाड यांना दिलेल्या शब्दाप्रामणे डॉ. अक्षदीप अग्रवाल आणि डॉ. मनोज वर्मा यांनी चक्क ६३ हजारांची सवलत देवून रुग्णाला फार मोठा दिलासा दिला. तेव्हा एकच तुतारी फुंकली गेली…
*************************
गणपती बाप्पा मोरया, रुग्णांसाठी ‘आधार’ बनू या!
रुग्णांना ठरत आहेत , कांतीलाल कडू ‘आधारवड’
कोविड पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या कार्याला अधिक तेज चढले आहे. साडेतीनशेहून अधिक कोविड रुग्ण हॉस्पिटलला त्यांनी दाखल करून सेवेचा आलेख उंचावत ठेवला आहे. याशिवाय विविध हॉस्पिटलमधून बिलाच्या रकमेत सूट देत आतापर्यंत २५ लाखाहून अधिक रकमेचा परतावा, सवलत देवून ते रुग्णांना आधारवड ठरले आहेत.
जिथे रुग्णांचे नातेवाईक, लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली तिथे कांतीलाल कडू आपुलकीने, मायेने सहकार्य करीत असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष कामाबाबत सर्वत्र सामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.