
नवी मुंबई : प्रभागातील नालेसफाई, शेवाळलेल्या पदपथाच्या सफाईसाठी ब्लिचिंग पावडर, उद्यानाची सफाई, नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीची मागणी आदी नागरी समस्या सोडविण्याची मागणी एका लेखी निवेदनातून प्रभाग ४२ मधील भाजप कार्यकर्त्या सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सुनिता हांडेपाटील यांनी, कोपरखैराणे सेक्टर २३ परिसरातील श्रमिकांच्या सौजन्य को.ऑप. हौ. सोसायटीमधील अंर्तगत भागात महापालिका प्रशासनाकडून पथदिवे तसेच छोटेखानी हायमस्ट लावण्याची मागणी करताना सांयकाळनंतर होणारा अंधार व महिला वर्गाला जाणवणारी असुरक्षितता आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.
कोपरखैरणे प्रभाग ४२ मध्ये सेक्टर १६, १७, २२, २३ या विभागाचा समावेश होत असून गृहनिर्माण सोसायट्या तसेच बैठ्या चाळींचाही यात समावेश आले. सध्या पावसाळा सुरू झाला असून प्रभागातील सेक्टर १६, १७, २२, २३ विभागात असणाऱ्या पदपथांची महापालिका प्रशासनाने ब्लिचंग पावडर टाकून सफाई करावी. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. संततधार पाऊस पडल्यावर पदपथावर शेवाळ साचून निसरडे झाले आहेत. पदपथावरून चालताना महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यांना जखमा होतात. या समस्येबाबत तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळसर यांना १८ जून रोजी लेखी निवेदन सादर केले होते. रहीवाशी, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना शेवाळलेल्या पदपथामुळे होणारा त्रासही पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे.
कोपरखैराणे सेक्टर २२ मध्ये प्लॉट क्र ३, सिडकोनिर्मित श्री ही गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगतच पालिकेचे उद्यान व एक नाला आहे. पावसाळीपूर्व कामांतर्गत या नाल्याची यंदा पालिका प्रशासनाकडून स्वच्छता झालेली नाही. या नाल्यात कचरा तुंबलेला असतो. स्थानिक रहीवाशांना या जीवघेण्या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नाल्यामुळे डास वाढीस लागले आहेत. स्थानिक रहीवाशांना नाग-सापाचे दिवसाआड दर्शनही होत आहे. उंदरांचाही उपद्रव वाढल्याने उंदिर खाण्यासाठी साप आता सोसायटी आवारातही येवू लागले असल्याने नाल्याच्या सफाईची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी केली आहे.
कोपरखैराणे सेक्टर २३ मध्ये प्लॉट क्रं ६ वर, सिडकोनिर्मित श्री. वसुंधरा सोसायटी आहे. या सोसायटीच्यासमोर महापालिकेचे छोटेखानी उद्यान आहे. मागील काही काळापासून या उद्यानाची महापालिका प्रशासनाकडून सफाई झालेली नाही. या उद्यानामुळे परिसराला बकालपणा आला आहे. तिथे अधूनमधून रहीवाशांना साप व नागाचे दर्शनही होत आहे. त्या उद्यानात पालापाचोळा, फांद्या पडल्या असून पावसात त्या उद्यानातून काळे पाणी बाहेर येत असते. उद्यानातील अस्वच्छतेमुळे स्थानिक रहीवाशांना डासांचाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू आदी साथींच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती सुनिता हांडेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.