
पर्यावरणप्रेमी रवींद्र भगतांची पालिका आयुक्त अभिजित बांगरांकडे मागणी
नवी मुंबई : मालमत्ता कर व पाणीदेयकाचा भरणा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुगल पे, फोन पे, पेटियम आदि सुविधांचा वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी रवींद्र भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या कोरोनाचा काळ आहे. लोक सरकारी सुचनांची व घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करताना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडत नाही. बॅकामध्येही जाण्याचे टाळून अन्य मार्गाने घरबसल्याच इंटरनेटच्या माध्यमातून बॅकींग व्यवहार करत आहेत. सध्या महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी व मालमत्ता कर रहीवाशांना पाठविण्यास सुरूवात केली आहे. महापालिका प्र्रशासनाने नवी मुंबईकरांना पाणीपट्टी व मालमत्ता कर भरण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटियम आदी साधनांचा वापर करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. ज्यायोगे पाणीदेयक व मालमत्ता कर देयक भरण्यासाठी लोकांना महापालिका विभाग अधिकारी कार्यालयात जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी महापालिकेत देयके भरण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटियम आदींचा वापर करण्याची सुविधा दिलेली आहे. त्या धर्तीवर नवी मुंबईकरांना देयके भरण्यासाठी अशी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे.