• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2020

पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!: सत्यजीत तांबे

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा : सत्यजीत तांबे

मुंबई : कोरोनाचे संकट येण्याअगोदरच नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अशा १२ करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम २-४ वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते भोगावे लागणार आहेत. अर्थव्यवस्था हाताळण्यात केलेल्या या चुकांसाठी पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

सत्यजीत तांबेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतलेल्या, ‘कहां गये वो २० लाख करोड?’ या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बेरोजगार युवकांशी संवाद साधत त्यांना २० लाख कोटींच्या पॅकेजची काय मदत मिळाली हे जाणून घेतले. जिल्हा व तालुका पातळीवर बेरोजगार युवकांशी साधलेल्या संवादातून रोजगाराची गंभीर स्थिती समोर आली आहे. गेलेल्या नोकऱ्या परत मिळत नाहीत. लॉकडाउन संपला तरी खर्चाला कात्री लावण्यासाठी कंपन्या कामावरून काढत आहेत. जगायचे कसे हा प्रश्न आहे, अशी निराशा युवकांनी व्यक्त केली. तर “पैसे जाऊ द्या, मोदी म्हणतात नोव्हेंबरपर्यंत ८० करोड लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. आमच्या गावात तर कुणालाच नाही भेटली ही मदत” अशी सद्यस्थिती असल्याचे काहींनी सांगितले. मोदींनी घोषित केलेल्या २० लाख करोडच्या पॅकेजबद्दल तरुणांमध्ये नाराजी आणि मोदींनी भ्रमनिरास केल्याचे प्रकर्षाने जाणवले.

उद्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनाच ‘कहां गये वो २० लाख करोड?’ हा जाब विचारणार आहेत.

Previous Post

सारसोळेच्या संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले

Next Post

भाजप आमदाराच्या घरापुढे युवक कॉंग्रेसचे आंदोलन

Next Post
भाजप आमदाराच्या घरापुढे युवक कॉंग्रेसचे आंदोलन

भाजप आमदाराच्या घरापुढे युवक कॉंग्रेसचे आंदोलन

कोरोनाच्या संकटात डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाचे भरीव योगदान

कोरोनाच्या संकटात डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाचे भरीव योगदान

केशरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना महापालिकेकडून धान्य देण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com