
नवी मुंबई : राज्यातील एसटी महामंडळ सेवा व महानगरीतील सार्वजनिक वाहतूक सेवा त्वरित सुरू करा या मागणीसाठी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने नेरूळ पूर्व येथील बेस्ट डेपोमध्ये वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगडे यांचे नेतृत्वाखाली ‘डफली बजाओ’ आंदोलन घेण्यात आले.
यावेळी नवी मुंबई निरीक्षक संतोष कुशल वर्धन , अरुण गायकवाड , गौतम गायकवाड, विष्णू वासवानी, अशोक शेगावकर, शंकर पडळकर, दिपक गायकवाड, निकाळजे गुरुजी, मोरे, गौतम चव्हाण, राहुल शिरसाट, कल्याण हनवते, नैनेश कटके, काशिनाथ पवार, गौतम शिरसाठ आदींसह वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.