
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक मा.नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांच्या विशेष प्रयत्नाने महापालिकेच्या वतीने बुधवार, दिनांक ०९ सप्टेंबर रोजी
नेरुळ सेक्टर-१६ ए, महापालिका शाळा क्रमांक-९ येथे सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत मोफत कोवीड अँटीजन टेस्ट व RT-PCR टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आपला विभाग कोराना मुक्त करण्यासाठी अँटीजन टेस्ट करण्याचे अवाहन जनसेवक गणेशदादा भगत यांनी नागरिकांना केले होते. त्याला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणावर आपल्या अँटीजन टेस्ट व RT-PCR टेस्ट करून घेतल्या.
सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी जनसेवक गणेशदादा भगत, मा.नगरसेविका रूपाली किस्मत भगत आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर, नर्स, महापालिका अधिकारी वर्ग, समाजसेवक राजु तिकोने, पांडुरंग बेलापुरकर, रमेश नरवड़े, दत्तात्रय माने, सागर मोहिते, अशोक गांडाल, रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली.