
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील आगरी-कोळी या स्थानिक ग्रामस्थांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या व अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सारसोळे गावचे विकासपर्व असणाऱ्या मनोज यशवंत मेहेर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.
नवी मुंबई शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व त्याग करणाऱ्या आगरी-कोळी समाजबांधवांना आजही न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरावर टांगती तलवार आहे. रोजगार नाही. खाडीत दूषित पाणी आल्याने मासेमारीही संपत आहे. गावात समस्यांचे डोंगर तर शहरात विकासाचे डोंगर यामुळे ग्रामस्थांना आजही उपेक्षेचे जीवन जगावे लागत आहे. महापालिकाही गावाकडे लक्ष देत नाही, तरीही या शहराला पुरस्कार भेटतात. नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजबांधवांची खरी स्थिती राज्यपालांच्या निदर्शनास आणून देताना या लढ्यात त्यांनाही सहभागी करून घेण्याचा आपला मानस असल्याचे सारसोळे गावचे विकासपर्व असणाऱ्या मनोज मेहेर यांनी यावेळी सांगितले.