
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात वरूणा व हिमालय या सिडकोच्या दोन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागी सिडकोने मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर जवळपास २५ लाख रूपये खर्च करून भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट बांधले. हे अनधिकृत मार्केट नंतर तोडण्यात आले. यामध्ये करदात्या नागरिकांच्या कष्टाचा निधी पाण्यात गेला आहे. त्यामुळे सिडकोच्या जागेवर अनधिकृत मार्केट उभारणीसाठी वाया गेलेला लाखो रूपयांचा खर्च महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, महापालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्याकडे लेखी निवेदनातून व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर अनधिकृतरित्या मार्केट बांधले. हा भुखंड महापालिकेकडे हस्तांतरीत न झाल्याने सिडकोने ते अतिक्रमण जाहिर करत मार्केटवर कारवाई करत ते मार्केट पाडून जमिनदोस्त केले. याप्रकरणी महापालिकेचा २३ ते २५ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. हा जाणिवपूर्वक पाण्यात गेलेला निधी हा करदात्या नवी मुंबईकरांच्या घामाचा पैसा आहे. याप्रकरणी मार्केट मंजूर करणारे, महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात व महासभेत मंजुरीला प्रस्ताव पाठविणारे तसेच मार्केटसाठी ठेकेदाराला देयक मंजुर करणारे शहर अभियंत्यापासून जे जे महापालिका अधिकारी जबाबदार आहेत, त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून महापालिकेचा वाया गेलेला निधी त्यांच्या वेतनातून, वेळ पडल्यास पीएफमधील पैसा काढून वसूल करावा. यातील दोषी कोणी अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांच्या संपत्तीचा लिलाव करून हा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा करावा अशी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या जागेवर महापालिकेने बांधलेले मार्केट तोडण्याची नामुष्की महापालिकेवर आली. करदात्या नवी मुंबईकरांचे सुमारे २२ ते २५ लाख पाण्यात गेले. त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटसाठी पाण्यात गेलेला लाखो रूपये खर्च संबंधितांकडून वसूल होणे आवश्यक आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाने सिडकोने मार्केटसाठी आरक्षित ठेवलेल्या भुखंडावर मार्केट बांधले. या मार्केटकरिता महापालिका प्रशासनाचे अंदाजे २२ ते २५ लाख रूपये खर्च झाले आहेत. मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाचे सिडकोकडून महापालिकेकडून हस्तांतर होणेपूर्वीच मार्केट बांधल्याने हे मार्केट अनधिकृत ठरले व या अनधिकृत मार्केटवर स्वत:च हातोडा चालविण्याची व मार्केट पाडण्याची नामुष्की शुक्रवार, दि. ८ जून २०१८ रोजी प्रथमच महापालिका प्रशासनावर आली. या अनागोंदी कारभारामुळे महापालिका प्रशासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांचा आहे. सिडकोकडून भुखंड हस्तांतरीत न होताच त्यावर मार्केट का बांधण्यात आले व त्या जागेवर २२ ते २५ लाख रूपये महापालिका प्रशासनाचे खर्च झाले. ते मार्केट अनधिकृत ठरले व महापालिकेला ते मार्केट पाडावे लागले. महापालिकेच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेवून कार्यवाही केली, त्या सर्व अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटवर झालेला खर्च संबंधितांकडून लवकरात लवकर वसूल करण्यात यावा यासाठी आपण नगरविकास खात्याच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला आदेश द्यावेत आणि याबाबत महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली याचा लेखी अहवाल प्राप्त करून द्यावा! याबाबत महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा सुरु आहे. आपण आम्हा नवी मुंबईकरांना न्याय मिळवून द्यावा आणि करदात्या नवी मुंबईकरांचे पाण्यात गेलेले पैसे संबंधितांकडून वसूल करून पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यासाठी आम्ही करत असलेल्या पाठपुराव्याला न्याय देण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून केली आहे.
****
८ जून २०१८ रोजी महापालिकेने सिडकोच्या मार्केटसाठी आरक्षित भुखंडावर मार्केट अनधिकृतरित्या भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच बांधले. हे अनधिकृत मार्केट नंतर पाडण्यात आले. या प्रक्रियेत करदात्या नवी मुंबईकरांचे जवळपास २५ लाख रूपये पाण्यात गेले आहे. मार्केटसाठी आरक्षित असलेला हा भुखंड हस्तांतरीत न होताच त्यावर अनधिकृतरित्या मार्केट बांधणारे महापालिकेचे जे जे दोषी आहेत, त्यावर कारवाई करून, वेळ पडल्यास त्यांच्या पीएफमधून रक्कम जमा करावी. यासाठी मी आज पाठपुरावा करत नाही. १० ऑगस्ट २०१८ पासून मी मंत्रालय व महापालिकेत पाठपुरावा करत आहे. याशिवाय अन्य कोणत्याही बाबतीत आपणास स्वारस्य नाही. पालिकेच्या तिजोरीतून वाया गेलेला जवळपास २५ लाख रूपयांचा निधी पुन्हा वसूल करण्यासाठी प्रशासनदरबारी आपला पाठपुरावा व संघर्ष सुरू आहे.
संदीप खांडगेपाटील – पत्रकार