
Navimumbailive.com@gmail.com :- ९८२००९६५७३
समाजसेवक हरेश भोईर यांचा पालिका आयुक्त अभिजित बांगरांकडे पाठपुरावा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ९ येथील अहिल्याबाई होळकर हा क्वारन्टाईंन सेंटरमधील कोरोना रूग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची चौकशी करण्याची मागणी समाजसेवक हरेश भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना आजाराच्या विळख्यात नवी मुंबई शहर व या शहरातील नवी मुंबईकर अडकलेले आहेत. कोरोनाचा प्रसार व उद्रेक रोखण्यासाठी व कोरोनाच वाढती साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासन व ऐरोलीचे आमदार, लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अथक प्रयास करत आहेत. कोरोना रूग्णांना रूग्णालयीन सुविधा, क्वारन्टाईंन सेंटर व अन्य उपचाराच्या सुविधा यावर स्वत: तुम्ही बांगरसाहेब आणि नवी मुंबईचे विकासपर्व संदीपजी नाईकसाहेब सातत्याने ‘अपडेट’ घेत आहेत. नेरूळ पूर्वेकडील सेक्टर ९ मधील अहिल्याबाई होळकर या क्वारन्टाईंन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांच्या जेवणाबाबत सातत्याने तक्रारी येत आहे. भोजन निकृष्ठ दर्जाचे देत असल्याचा उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना रूग्णांकडून टाहो फोडला जात आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आपणही या वस्तूस्थितीचा आढावा घ्या. आपणासही समस्येचे गांभीर्य समजून येईल. आपण अहिल्याबाई होळकर क्वारन्टाईंन सेंटरमधील रूग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची चौकशी करून भोजन सुधारणेचे निर्देश द्यावेत. भोजनाच्या निकृष्ठ दर्जाबाबत कोरोना रूग्णांच्या वाढत्या तक्रारीमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासन कोरोना रूग्णांसाठी करत असलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले असून आपली प्रतिमा मलीन होत आहे. आपण लवकरात लवकर संबंधितांना भोजनाचा दर्जा सुधारण्याचे आदेश द्यावेत अथवा भोजनपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला हटवून चांगल्या दर्जाचे भोजन पुरविणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला ते काम द्यावे, आपण स्वत: भोजनाबाबत चौकशी करावी,अशी मागणी समाजसेवक अभिजित बांगर यांनी केली आहे.