• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2020

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे: बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in Uncategorized
0
केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे: बाळासाहेब थोरात

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३

कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत थोरात यांचा संवाद; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार.

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईतील गांधी भवन येथे राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी कामगार नेते आ. भाई जगताप, विश्वास उटगी, इंटकचे कैलाश कदम, दिवाकर दळवी, निवृत्ती देसाई, ऑल इंडिया ट्रेड युनियनचे कृष्णा भोयर, उदय चौधरी, सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे सईद अहमद, हिंद मजदूर सभेचे सुधाकर अपराज व संजय वढावकर, एक्टू चे उदय भट व विजय कुलकर्णी, AIUTUC चे अनिल त्यागी, राज्य सरकार एम्पल कन्फेडरेशनचे विश्वास काटकर, भारतीय कामगार सेना महासंघाचे संतोष चाळके, न्यू ट्रेंड युनियन (NIUI) चे एम. ए. पाटील व श्री मिलिंद रानडे, श्रमिक एकता संघाचे दिलीप पवार, ट्रेड युनियन सेंटर ऑफ इंडियाचे संजय संघवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, भाजपा सरकारने संसदीय नियम व लोकशाहीला पायदळी तुडवून लोकसभा व राज्यसभेत कृषी कायदे व कामगार कायदे मंजूर केले. हे दोन्ही कायदे कामगार व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळेच आज विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत या संदर्भात चर्चा केली. कामगार कायद्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मुंबई हे कामगार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. कामगारांना महत्वाचे स्थान हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी खूप प्रयत्न, संघर्ष करावे लागले आहेत. कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्याचे काम सुरुवातीला महाराष्ट्रातच झाले. काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कामागारांसोबत असून त्यांना संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करत राहिल, असेही थोरात म्हणाले.

 

Previous Post

स्वच्छ भारत मिशन – २०२१अंर्तगत सानपाडा प्रभाग ७६ मध्ये सुशोभिकरण मोहीम राबवा : पांडूरंग आमले

Next Post

पालिकेकडून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकर द्या : गणेश भगत

Next Post
नवी मुंबई शहरात कोरोना टेस्ट लॅब लवकर सुरू करा : गणेश भगत

पालिकेकडून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकर द्या : गणेश भगत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

नेरूळ प्रभाग ९६ मध्ये सुशोभिकरण मोहीम राबवा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील मार्गफलक तातडीने बदला : मनोज मेहेर

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील मार्गफलक तातडीने बदला : मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com