
सुजित शिंदे : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांनी आजपासून स्विकारला पदभार
नवी मुंबई : देशात आता गंभीर प्रश्न उभे असताना त्यावरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप, आर.एस. एस, बजरंग दल एक सुनियोजित कट रचून देशात हिंदू, मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र देशातील जनता आता मूर्ख नसून सुज्ञ बनत चालली आहे. त्यामुळे जनता भाजपच्या असल्या भूलथापांना यापुढें बळी पडणार नाही, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
ए.आय.एम.आय.एम प्रणित विद्यार्थी आघाडीचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई कामोठेमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मागील पाच वर्षे राज्यात भाजपचे सरकार होते, मात्र तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे नाही वाटले आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्यामुळे भाजप मुळ मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्यांना हात घालत आहे आणि असे आहे तर केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करुन दाखवून द्यावे. नाहक नागरीकांचे लक्ष विचलित करू नये असे देखील जलील यांनी सूनावले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वारीस पठाण,फैयाज अहमद,महासचिव शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कुणाल खरात, प्रभाकर पारधे, शहजाद खान, प्रशांत वाघमारे, रुमान राझवी, सानीर सय्यद, मझर पठाण आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
हाजी शाहनवाझ खान यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे व रायगड जिल्ह्यात हाजी शाहनवाझ खान यांचा असलेला जनसंपर्क एमआयएमला नजीकच्या काळात पक्षसंघटनेसाठी उपयुक्त ठरणार असल्याने त्यांच्या प्रदेश महासचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
*** आज देशात असो किंवा राज्यात सर्वच स्तरावर विद्यार्थी व तरुणांच्या चळवळीतुन एक चांगल्या प्रकारे नेतृत्व पुढे येत आहे आणि येणाऱ्या दिवसात या विद्यार्थ्यांच्या चळवळीला एम एम आय आणखी बळकटी देईल. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोकण असो किंवा नवी मुंबई येथील एकही कॉलेज शिल्लक नसेल की जिथे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमची विद्यार्थी आघाडी लढताना दिसेल.
- हाजी शाहनवाझ खान,
महासचिव, एम. आय.,एम