• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2020

श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

adminbyadmin
in Uncategorized
0
श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

स्वयंम न्यूज ब्युरो :  ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com

आ. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते घटस्थापना पूजा संपन्न

नवी मुंबई : सालाबादप्रमाणे किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिरामध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते  घटस्थापना पूजा संपन्न होऊन नवरात्रोत्सवास उत्साहाने सुरुवात झाली. कोरोना सारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत व्हावे व ज्या आर्थिक संकटाना नागरिक सामोरे जात आहेत ते संकट दूर होऊन सर्व काही पूर्व पदावर येऊन सुख, शांती आणि समृद्ध जीवन सर्वांना लाभो अशी प्रार्थना आज गोवर्धनी मातेला घटस्थापना पूजेवेळी केली असल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले. 

       नवी मुंबईतील सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणजे श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी आख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री गोवर्धनी आईची जनमानसात ख्याती आहे. श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार १३ वर्षांपूर्वी आ. म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला होता. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये यथोचित पूजा अर्चा व १० दिवस उत्साहाने उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव साधेपणाने, सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्यात येणार  असल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले. 

Previous Post

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

Next Post

कोरोना रुग्णवारील वैद्यकीय उपचार देयकाची चौकशी करा : मनोज मेहेर

Next Post
मनोज मेहेर यांचा प्रभाग समिती सदस्यपदाचा राजीनामा

कोरोना रुग्णवारील वैद्यकीय उपचार देयकाची चौकशी करा : मनोज मेहेर

कोविड सेंटर उभारा, मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे काय? : लोकनेते आ. गणेश नाईक

कोविड सेंटर उभारा, मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे काय? : लोकनेते आ. गणेश नाईक

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

नवी मुंबईत सोमवारी आढळले २०५ नव्याने कोरोना रूग्ण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com