
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोविड सेंटर उभारले जात आहेत, याबाबत मी योग्य काय किंव अयोग्य काय याबाबत बोलणार नाही. मात्र जर पालिका कोविड सेंटर उभारत असेल तर त्यातील मनुष्यबळाचे काय? मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने नेमणे आवश्यक आहे. याबाबत मी आयुक्तांना सूचना केल्या होत्या, की अनेक राज्यांत कोविडचा प्रादुर्भाव कमी आहे तेथील वैद्यकीय तज्ञांना पालिकेत तात्पुरत्या सेवेसाठी बोलवा त्यामुळे तज्ञांमुळे भेडसावणाऱ्या अडचणी कमी होतील, काही दिवसांत आयसीयु व व्हेंटिलेटर्सची कमतरता देखील शहरातील कमी होणार असून त्यादृष्टीने पाऊले उचलली गेली आहेत असे प्रतिपादन नवी मुंबईचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपाचे ऐरोलीतील आमदार मंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सोमवार (दि. १९ ऑक्टोबर) रोजी आ. गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली, त्याबाबत माहिती देताना ते बोलत होते.
गणेशोत्सवात नागरिक कोविड १९ संदर्भातील नियम पायदळी तुडवताना दिसले. येत्या काळात दसरा, दिवाळीसह अनेक सण येणार आहेत. महापालिकेने ही खबरदारी घेत, जनजागृती करणे गरजेचे आहे. शहरात सर्वत्र जागृती करणारे होर्डिंग लावणे गरजेचे आहे. हिवाळ्यात कोरोना बधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने खबरदारी पालिकेने घेण्याची शक्यता असल्याच्या सूचना आयुक्तांना केल्याचे आ. गणेश नाईक यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे देशात उत्पादन क्षमता कमी झाली आहे. परिणामी सरकारकडे पुरेसा कर जमा झालेला नाही. त्यामुळे पालिकांना देखील शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता आरोग्याच्या, शिक्षणाच्या व मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा इतर बाबींवर खर्च करू नये, अशा महत्वपूर्ण सूचना लोकनेते गणेश नाईक यांनी पालिका आयुक्तांना केल्या आहेत. यासोबत ९६ साफसफाई कंत्राटदार पालिका सुरू झाल्यापासून शहरात सेवा देत आहेत. मात्र आता नव्याने कंत्राट देताना एकदा नव्हे तर तीनदा मुदत वाढवली. जर आपणाकडे कंत्राटदार आहेत तर तर उगाचच मुदत का वाढवली जात आहे. कोणाच्या राजकीय दबावापोटी ही मुदत वाढवून फायदा मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप यावेळी त्यांनी केला. कोरोनाच्या काळात अशा चुकीच्या पद्धतीने कारभार हाकला जात असल्यास आम्ही गप्पा बसणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी आ. गणेश नाईक यांनी आयुक्तांच्या कारभारावर समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी आयुक्तांना झाडांच्या छाटणीबाबत प्रश्न उपस्थित केला. झाडे छाटणीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने फांद्या तोडल्या जात असल्यास त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असल्याचे आ. गणेश नाईक यांनी मागणी केली. माजी महापौर जयवंत सुतार यांनी महिलांच्या प्रसूतीविषयी आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केला.
नवी मुंबई क्षेत्रातील एखादी महिला आपल्या गरोदरपणाच्या काळात वारंवार रुग्णालयांत जाते. तिला योग्य सल्ले दिले जातात. मात्र तिच्या प्रसूतीच्या काळात मात्र त्यांना खासगी रुग्णालयांत जायला सांगितले जाते. याविषयी आयुक्तांनी तातडीने दखलजर तुमच्याकडे यंत्रणा नसेल तर आधीच त्या महिलेला खासगी रुग्णलयांत जायला सांगा, त्यामुळे त्या महिलेचे व बाळाचे प्राण वाचतील असे आ. गणेश नाईक यांनी या प्रश्नावर मत व्यक्त केले.