
माजी नगरसेविका रूपाली भगत, गणेश भगत यांनी घेतली भेट
स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले आहे. यापूर्वीही आपण पालिका आयुक्तांच्या या समस्या सोडविण्यासाठी चार वेळा भेट घेवूनही समस्या मार्गी लागत नसल्याची नाराजी गणेश भगत यांनी आयुक्तांसमवेत झालेल्या चर्चेत बोलून दाखविली.
पालिका आयुक्त, संबंधित अधिकारी, विभाग अधिकारी कार्यालय सर्वांकडे पाठपुरावा करू व भेटीगाठी सतत घेवूनही समस्या सुटत नसल्याने स्थानिक रहीवाशांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे, लोकांच्या असंतोषाचा सामना करावा लागत असल्याची नाराजीही गणेश भगत यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, जनसेवक गणेश भगत, समाजसेवक रवींद्र भगत यांनी महापालिकेत जावून प्रभाग ९६ मधील प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करताना आजवर पालिका प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा कागदपत्रासह पालिका प्रशासनाकडून झालेली चालढकल आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
चर्चेदरम्यान गणेश भगत यांनी ?नेरुळ सेक्टर-१६ए प्रथमेश सोसायटी पाठीमागील रस्ता डांबरीकरण करणे, ?नेरुळ सेक्टर-१६ए शिवनेरी आणि परिमल सोसायटी मधील मल:निस्सारण वाहिनी बदलणे, ?नेरुळ सेक्टर-१६ छत्रपती संभाजी राजे उद्यानातील ५ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे झाड़े पडून तूटलेली खेळणी दुरुस्त करणे, ?वसई विरार महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेने नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणी बिल भरण्याकरिता पेटीएम, फोन पे, गूगल पे सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्या धर्तीवर आपल्या नवी मुंबई महानगर पालिकेने सुद्धा नवी मुंबईकराना मालमत्ता कर आणि पाणी बिल भरण्याकरिता पेटीएम, फ़ोन पे, गूगल पे सुविधा उपलब्ध करून देणेबाबत, ?नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुशोभीकरण मोहिम राबवून शाळा, मैदान, उद्यान, चौक, पदपथ, समाजमंदिर, सोसायटी सरंक्षक भिंती यांची रंगरंगोटी करून भिंतीवर सुभाषित रंगवावीत तसेच प्रभागातील रस्ते,गटारे व महावितरण सबस्टेशन परिसरातील डेब्रिज व कचरा स्वछ करण्यात यावे, ?नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी या विषयावर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. आयुक्तांनी सर्व कागदपत्रांची व केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत लवकरात लवकर या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन गणेश भगत यांना दिले.