
स्वयंम न्युज ब्यरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- नवी मुंबईतील एकमेव असे नाट्यगृह असलेले वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमूळे गेल्या ८ महिन्यापासून सदर नाट्यगृह बंद असून तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच नाट्यगृहात नाटकांचे प्रयोगही होत नसल्याने कलाकारांचेही नुकसान होत आहे. सदर नाट्यगृह लवकर सुरू व्हावे याकरिता नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांची सातत्याने मागणी होत आहे. सद्य:स्थितीत लॉकडाऊन शिथिल झाल्याने मास्क वापर अनिवार्य, सोशल डिस्टनसिंग तसेच शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून विष्णुदास भावे नाट्यगृह खुले करण्यास काहीही हरकत नसल्याने सदर नाट्यगृह लवकरात लवकर खुले करण्याची मागणी आ. मंदाताई म्हात्रे यांनी निवेदनातून केली आहे.