
सुजित शिंदे : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या नवी मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्याकरिता अभय योजना लागू करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
राज्यातील इतर भागाप्रमाणे नवी मुंबई शहरातही कोरोनाचा उद्रेक आहे. मार्चपासून कोरोनामुळे पूर्णपणे अर्थकारण ठप्प झालेले आहे. अनेकांना आजही रोजगार नाही. सर्वत्र टाळेबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झालेली आहे. अनेक कंपनी व आस्थापनेमध्ये वेतनकपातही झालेली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मालमत्ता कराचा वेळेवर भरणा करणे शक्य झालेले नाही. महापालिका प्रशासनाने थकीत मालमत्ताकरासंदर्भात नवी मुंबईकरांना ‘अभय योजने’च्या माध्यमातून सुविधा डिसेंबर २०१९ मध्ये पाच महिन्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली होती. तथापि मार्च २०२०च्या मध्यापासून कोरोना आगमन वाढीस लागल्यामुळे नवी मुंबईकरांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे आपण सध्या कोरोना काळामुळे विस्कटलेली नवी मुंबईकरांची आर्थिक घडी पाहता महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता पुन्हा एकवार ठराविक कालावधीकरिता ‘अभय योजना’ पुन्हा नव्याने लागू करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.