
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन – २०२१ अंर्तगत नवी मुंबई शहरामध्ये सुशोभीकरण मोहीम राबविताना अविकसित असलेल्या गावठाणातील नागरी समस्या सोडविण्याचा व तेथे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी लेखी निवेदनातून नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
गेल्या वर्षी स्वच्छ भारत मिशन यामध्ये आपल्या नवी मुंबई शहराचा देशामध्ये तिसरा क्रमांक आला. यामध्ये पालिका अधिकारी व सफाई कामगार यांचे असलेले अतुलनीय योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. महापालिका शासनाकडून सध्या स्वच्छ भारत मिशन-२०२१ अभियानास सुरूवात झालेली आहे. देशामध्ये आपल्या नवी मुंबईचा प्रथम क्रमांक यावा यासाठी आपण सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्नांना सुरूवातही केलेली आहे. त्याबाबत अशोक गावडे यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच पालिका प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
या अभियानामध्ये नवी मुंबई शहरात येणाऱ्या सर्व पालिका प्रभागांचा हातभार लागावा या प्रामाणिक हेतूने आपणास हे निवेदन सादर करत आहे. नवी मुंबई शहरात नोडमध्ये येणाऱ्या सर्व प्रभागातील शाळा, कॉलेज, समाजमंदिर, मार्केट, चौक, उद्यान, सोसायटीच्या संरक्षक भिंत यांची रंगरंगोटी करण्यात यावे, सुशोभित भिंतीवर सुभाषित रंगवावीत, सुभाषितांमधून लोकप्रबोधन, जनजागृती व्हावी हाच एकमेव हेतू आहे असल्याचे सांगून अशोक गावडे पुढे म्हणाले की, प्रभागातील रस्ते, गटारे, डेब्रिज हटविण्यात यावे, विद्युत डीपीची सफाई, पदपथाचीही रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. आपण स्वत: परिसराची पाहणी करावी. नेरूळ नोडमध्ये येणाऱ्या सर्व प्रभागाचे सुशोभीकरण व नागरी समस्यांचे निवारण झाल्यास स्वच्छ भारत मिशनच्या मोहीमेलाही हातभार लागेल, असे अशोक गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
केवळ रंगरंगोटीच नाही तर गावठाणातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. नवी मुंबईच्या विकसित कॉलनी व अविकसित गावठाण हे चित्र या शहराला भूषणावह नाही. नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांची गावे आहेत, पण या गावामध्ये विकास न झाल्याने तेथे नवी मुंबई दिसत नाही. गावठाणातील नागरी समस्यांचे निवारण झाल्यास तेथेही खऱ्या अर्थाने सुशोभीकरण झालेले पहावयास मिळेल. महापालिका प्रशासनाकडून प्रभागाप्रभागात स्वच्छतेबाबत जनजागृती व प्रबोधनही करण्यात यावे. नवी मुंबई शहराचा स्वच्छ भारत मिशनमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक यावा ही प्रत्येक नवी मुंबईकराची इच्छा आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला जे जे सहकार्य हवे असेल, ते सर्व करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसपणे प्रामाणिकपणे पुढाकार घेईल, ही ग्वाही यानिमित्ताने देत आहोत. स्वच्छ भारत मिशनमध्ये नवी मुंबई शहराचा केवळ कागदावर नाही तर खऱ्या अर्थामध्ये प्रथम क्रमाकांवर आणण्यासाठी गावठाण व कॉलनीमधील विकासाची विषमता दूर करण्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी अशोक गावडे यांनी केली आहे.