
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईत ३३४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर २०५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईत कोरोना बाधितांची संख्या ४२ हजार ४१७ तर बरे झालेल्यांची ३८ हजार ७९५ झाली आहे.
नवी मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून ९१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. ही समाधानाची बाब असून नवी मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल असल्याचे बोलले जात आहे. यासोबत कोरोना बाधितांचा आकडा देखील कमी होण्यास सुरुवात झाली असून गेला आठवडाभर कोरोना बाधितांचा चढता आलेख आता उतरू लागला आहे. आजमितीला नवी मुंबईत २ हजार ७६७ रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात ५ जणांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ८५५ झाली आहे. नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून दिवसभरात २ हजार ७१ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या १ लाख ५८ हजार ८९० झाली आहे. एकूण आर.टी.पी. सी.आर टेस्ट केलेल्यांची संख्या ९१ हजार ३६३ झाली आहे. कोविड चाचण्यांची एकूण संख्या २ लाख ५० हजार २५३ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर ३६, नेरुळ ३५, वाशी ५३, तुर्भे ९ कोपरखैरणे ३२, घणसोली २३, ऐरोली १७ दिघा शून्य इतके रुग्ण आढळले. नवी मुंबई शहरामध्ये महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासन कोरोना विरोधात करत असलेल्याउपाययोजनांमुळे कोरोनाची आकडेवारी घसरू लागल्याचे बोलले जात आहे.