
नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ७६ मधील सानपाडामधील चारही क्रिडागंणाची स्थानिक मुलांना खेळण्यासाठी युध्दपातळीवर सफाई करण्याची मागणी भाजपाचे स्थानिक नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिकेच्या सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३,७,८ या परिसराचा समावेश होत आहे. या प्रभागात खेळाची चार क्रिडांगणे असून सानपाडा सेक्टर ८ मधील सेव्हन्थ डे शाळेजवळ दोन्ही बाजूला खेळाचे मैदान व दुसऱ्या बाजूला हुतात्मा बाबु गेनू मैदान, सानपाडा सेक्टर ४ मधील क्रांतीवीर पन्हाळकर मैदान आणि सेक्टर २-३ मध्ये स्नेहबंधन सोसायटीलगतचे क्रिडांगण अशी चार क्रिडांगणे आहे. पावसामुळे या मैदानाला बकालपणा आला असून जंगली गवत वाढीस लागले आहे. ठिकठिकाणी दगड विखुरले आहेत. सध्या ऑनलाईन वर्गही आता बंद होवून मुलांना दिवाळीच्या सुट्टी आता सुरू होतील. मुलांना आता खेळण्यासाठी आता क्रिडांगणाची गरज आहे. मुले मार्चपासून घरात आहेत. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. सुट्टी लागल्यावर मुले खेळण्यासाठी क्रिडांगणात जाणारच. अशावेळी बकालपणाच्या अवस्थेतील क्रिडांगणे, जंगली गवत वाढलेली क्रिडांगणे, दगडी विखुरलेले आहेत. संबंधित पालिका अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या क्रिडांगणाची सफाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.