
नवी मुंबई : राज्य सरकारकडे प्रशासनाने पाठविलेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रस्तावामध्ये शिक्षकांचा व अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्र्रशासनाकडून नुकताच राज्य सरकारकडे ठोक मानधनावर पालिका प्र्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्र्रस्तावामध्ये पालिका प्र्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला नाही तसेच उल्लेखही करण्यात आलेला नाही. पालिका प्र्रशासनात ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या प्र्रस्तावामध्ये ठोक मानधनावरील शिक्षकांचाही समावेश करून सुधारीत प्र्रस्ताव पाठविण्यात यावा. पालिका प्र्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवा कायम होत असताना ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना त्यापासून वंचित ठेवणे योग्य नसून ही बाब संबंधित शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. पालिका प्रशासनाने ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचाही विचार करताना शिक्षकांचा त्या प्रस्तावामध्ये समावेश करून सुधारीत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा अथवा पाठविण्यात आलेल्या प्र्रस्तावाला जोडून हा शिक्षकांच्या कायम सेवेचा पुरवणी प्रस्ताव सादर करावा, तसेच अन्य कोणत्या आस्थापनेत ठोक मानधनावर काम करत असतानाही नजरचुकीने प्रस्तावात त्यांचा उल्लेख राहून गेला असल्यास नवीन सुधारीत अथवा पुरवणी प्रस्तावात त्यांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केली आहे.