
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘जिवाभावाचे मित्र’ या सोशल मिडियावर नावाजलेल्या व्हॉट्सअप ग्रुपकडून सारसोळे गावामध्ये शिवसेनेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक सतीश रामाणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीपभाऊ घोडेकर, शिवसेना नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी पालिका पक्षप्रतोद व शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, भाजपचे रवींद्र भगत, महापालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, मनसेचे गणेश पालवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार, उद्योजक प्रकाशशेठ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, मकरंद वैती यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी रतन मांडवे यांनी प्रास्तविकपर भाषणातून रामाणेंसोबत महापालिका सभागृहात घालविलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विजय माने व दिलीपभाऊ घोडेकर यांनीही आपल्या भाषणातून रामाणेंना शुभेच्छा दिल्या. रतन मांडवेंनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी सतीश रामाणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येवून उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील वैष्णवी बिल्डींगच्या समोर हा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे हे सर्व राजकीय घटक ‘जिवाभावाचे मित्र’ या व्हॉटसग्रुपचे सदस्य असून ग्रुपवर सातत्याने हे घटक एकमेकांशी सतत भांडत असले तरी प्रत्याक्षात मात्र या सर्वाची राजकारणविरहीत मैत्री असल्याचे रामाणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पहावयास मिळाले.