
स्वयंम न्यूज ब्युरो : 8369924646 / 9820096573
नवी मुंबई ः भाजपा आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्यातर्फे नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी, गरीब आणि गरजू नागरिकांंना दिवाळी निमित्त मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. सदर सुविधेचा शेकडो गरजू नागरिकांंनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश बुध्दजीवी मंडळाच्या जयश्री चित्रे, ‘भाजपा’चे नवी मुंबई उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, श्रीराम घाटे, आदि उपस्थित होते. दरम्यान, भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या गेल्या 26 वर्षापासून अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्या असून त्यांच्या कार्र्यामुळे गोर गरीबांमध्ये एक आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सध्या केोरोना महामारीतून नागरिक सावरत असताना यावर्षीची दिवाळी साजरी होईल की नाही या विवंचनेत गरीब असतानाच सालाबादप्रमाणे भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या गरीबांसाठी धावून आल्या आहेत. सदर धान्य वाटपातून आदिवासी आणि गरजू नागरिकांंना दिवाळी सणासाठी मोठी मदत होणार असल्याचे सौ. मंदाताई म्हात्रे सांगितले. यावेळी गरीबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपली दिवाळी साजरी झाल्याचेही त्या म्हणाल्या. बेलापूर मतदारसंघातील आदिवासी आणि गरजू नागरिकांंनी देखील मिळालेल्या मोफत धान्यामुळे आमची गरज भागली असून सालाबादप्रमाणे या वर्षीही दिवाळी निमित्त भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मोफत धान्य वाटपाची दिवाळी भेट देऊन केोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी व त्यातून उद्भवलेल्या महागाईच्या काळात आम्हाला फार मोलाची मदत केल्याचे मत व्यक्त केले.