
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कृष्णा सुतार यांनी ऐरोलीचे भाजप आमदार व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना नवी मुंबईतील विविध समस्ये विषयी निवेदन दिले. गेल्या काही महिन्यापासून सुनील सुतार नवी मुंबईतील समस्या निवारणासाठी सतत आ. नाईक व पालिका आयुक्त बांगर यांच्या भेटीगाठी घेत समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत.