• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2020

मुंबई पोलिसांपाठोपाठ ठाणे पोलिसांनीही छट पूजेला नाकारली परवानगी

adminbyadmin
in Uncategorized
0
मुंबई पोलिसांपाठोपाठ ठाणे पोलिसांनीही छट पूजेला नाकारली परवानगी

ठाणे : मुंबई पोलिसांपाठोपाठ ठाणे पोलिसांनीही छट पूजेला परवानगी नाकारली आहे. छट पूजेच्या दिवशी तलाव किंवा समुद्रकिनारी छट पूजा करु नका, गर्दी करु नका, तसेच छट पूजेनिमित्त कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू नका, छट पूजा घरीच करा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे. अनलाॅक काळातही कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांनी ही मनाई केली आहे.

छठ माता पूजा उत्सव समितीमार्फत दरवर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात छठ पूजेचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षीही छठ पूजेनिमित्त विविध पूजा कार्यक्रमांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र छठ माता पूजा उत्सव समितीने ठाणे पोलिसांच्या कापूरबावडी पोलिसांना दिले होते. मात्र, पोलिसांनी या पत्राला उत्तर देत परवानगी नाकारली असल्याचे समितीला कळवले आहे.

ठाण्यात उपवन तलाव, मासुन्दा तलाव तसेच कोलशेत घाट येथे छट पूजेचे आयोजन होत असते. या ठिकाणी संगीत भजन कार्यक्रम केले जातात. मात्र, आता हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोणीही गर्दी करू नये, यासाठी याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनीही नागरिकांना काळजी घ्यावी आणि यावर्षी घरातूनच सूर्य देवतेला वंदन करावे, असे आवाहन केले आहे.

Previous Post

नेरूळ पश्चिमच्या भाजपच्या गडाला पालिका निवडणूकीत खिंडार पडणार ?

Next Post

थोडेसे चिंताजनक, बुधवारी कोरोनाचा आकडा सव्वाशेच्या पार!

Next Post
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

थोडेसे चिंताजनक, बुधवारी कोरोनाचा आकडा सव्वाशेच्या पार!

रुग्णवाहिका चालकांना विनाकारण सायरन वाजवण्यास मनाई करण्याची मागणी

शुक्रवारी नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १६८

सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांची पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेच्या बांधकाम स्थळांना भेट

सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांची पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेच्या बांधकाम स्थळांना भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com