
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, महागाईच्या काळात कुटूंबाच्या उत्पन्नामध्ये महिलांचा हातभार लागावा, महिलांनी स्वावलंबी बनावे, पैशासाठी कोणावर अवलंबून राहू नये यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्या माध्यमातून नेरूळ तालुका कॉंग्रेसच्यावतीने महिलांसाठी विविध क्लासेस आयोजन करण्यात आले आहे. या क्लासेसच्या माध्यमातून महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून महिलांनी अर्थकारणातही सक्षम होवून आपला स्वतंत्र ठसा उमटवावा हाच या प्रशिक्षणामागील हेतू असल्याची माहिती उपक्रमाच्या आयोजन विद्या भांडेकर यांनी दिली.
नेरूळ सेक्टर दोनमधील दत्तात्रेय सोसायटीमधील कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात १ डिसेंबरपासून या अभिनव उपक्रमास सुरूवात होत असून यामध्ये महिलांना शिवण क्लास, मेंहदी क्लास, बेसिक पार्लर क्लास, कुकरी क्लास आदींचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जुईनगर व नेरूळमधील महिलांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचेआवाहन विद्या भांडेकर यांनी केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी विद्या भांडेकर – ९७०२६०५३२१, ८३६९४२१२३२, पूनम कांबळे – ८३६९४६९१९६ यांच्याशी संपर्क साधावा.