• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2020

वीज मीटर खंडीत करण्यासाठी आलात तर खबरदार : गणेश नाईकांचा महावितरणला खणखणीत इशारा

adminbyadmin
in Uncategorized
0
वीज मीटर खंडीत करण्यासाठी आलात तर खबरदार  : गणेश नाईकांचा महावितरणला  खणखणीत इशारा

वाढीव वीजबीलांविरोधात नवी मुंबई भाजपाचे वाशीत  हायव्होल्टेज आंदोलन

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई :  कोरोना काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजबीले तातडीने रदद करा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करीत ग्राहकांचे वीजमिटर खंडीत करण्यासाठी आलात तर खबरदार, असा इशारा ऐरोलीचे भाजप आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी महावितरणला दिला आहे.
वाढीव वीजबीलांविरोधात भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यात सोमवारी जळजळीत आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई भाजपाच्या वतीने शहरात प्रत्येक नोडमध्ये हे आंदोलन पार पडले. वाशी सेक्टर १७ येथील महावितरण कार्यालयासमोर आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हायव्होल्टेज आंदोलन झाले.
ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे विकासपर्व असलेले ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, सुरज पाटील, डॉ. जयाजी नाथ, संपत शेवाळे, नेत्रा शिर्के, अमित मेढकर, उषा भोईर, शशिकला पाटील, प्रकाश मोरे, प्रभाकर भोईर हे माजी नगरसेवक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, मारूती भोईर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुतार आदी मान्यवरांसह कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने या आंदोलनात भाग घेतला.
ग्राहकांना महावितरणने वेळेवर बिले दिली नाहीत. चुकीच्या रिडिंगमुळे, वाढीव युनिटमुळे आणि वाढवलेल्या दरांमुळे बीलांची रक्कम आकाशाला भिडली. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली असताना मोठ्या रकमेची जाचक बिले जनता कशी भरणार? असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी केला. वीजबीलांविरोधात जनतेचा संताप अनावर झाल्यानंतर वीजबीलात सवलत देण्याची घोषणा करणाऱ्या ऊर्जामंत्री यांनी नंतर या आश्वासनांपासून घुंमजाव केले. त्यामुळे या खोटारड्या सरकारवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असे लोकनेते आ. गणेश नाईक म्हणाले. वीजबीले भरू न शकणाऱ्या ग्राहकांचे मिटर खंडीत करण्याची कारवाई महावितरणने केली तर ती होवू देणार नाही, असे स्पष्ट करीत अशी कारवाई करण्यासाठी जर महावितरणचे कर्मचारी आले तर नागरिकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगावे, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.
चुकीची व वाढीव बीले सुधारित करून परत द्यावीत, वीजबीलात सवलत द्यावी, वाढवलेले वीजदर कमी करावेत आणि ज्यांनी बीले भरली आहेत त्यांचे पैसे पुढील बीलात समायोजित करावेत, अशा मागण्या यावेळी नाईक यांनी सरकारकडे केल्या. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढू, जनतेसाठी तुरूंगात जावे लागले तरी बेहत्तर, असा इशाराही दिला. आंदोलनकर्ते भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका केली.चुकीची व वाढीव बीले सुधारित करून परत द्यावीत, वीजबीलात सवलत द्यावी, वाढवलेले वीजदर कमी करावेत आणि ज्यांनी बीले भरली आहेत त्यांचे पैसे पुढील बीलात समायोजित करावेत, अशा मागण्या यावेळी नाईक यांनी सरकारकडे केल्या. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढू, जनतेसाठी तुरूंगात जावे लागले तरी बेहत्तर, असा इशाराही दिला. आंदोलनकर्ते भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका केली.

Previous Post

प्रभाग ४२ मध्ये सुनिता हांडेपाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेचे धुरीकरण अभियान

Next Post

तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपलेः बाळासाहेब थोरात

Next Post
रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपलेः बाळासाहेब थोरात

ठोक मानधनावरील शिक्षकांना न्याय मिळवून देणार : रवींद्र सावंत

ठोक मानधनावरील शिक्षकांना न्याय मिळवून देणार : रवींद्र सावंत

नेरूळ सेक्टर ८ मध्ये पालिकेचे भरणा केंद्र सुरू!

नेरूळ सेक्टर ८ मध्ये पालिकेचे भरणा केंद्र सुरू!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com