
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : पावसाळा संपताच कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये डासांचा उद्रेक वाढीस लागला. रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून भाजपा कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी थेट प्रभागात धुरीकरण अभियान राबवावे यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये सोमवारी (दि.२३ नोव्हेंबर) धुरीकरण अभियानास सुरूवात केली आहे.
प्रभाग क्रमांक ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२,२३ परिसरात पावसाळा संपताच विभागात डासांचा उद्रेक वाढीस लागला होता. रहीवाशी डासांच्या त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर विभागातील डासांचा त्रास संपुष्ठात यावा, साथीचे आजार वाढू नये म्हणून समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी पावसाळा संपताच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात, रो-हाऊसेस, बैठ्या चाळींमध्ये धुरीकरण करण्यात यावे यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत पालिका प्रशासनाने प्रभाग ४२ मध्ये सोमवारी धुरीकरण अभियान सुरू केले आहे. प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर १६ मधील रो-हाऊसेस, असोसिएशनमध्ये धुरीकरण करण्यात आले. उर्वरित दोन दिवसात संपूर्ण प्रभागामध्ये पालिका प्रशासनाकडून धुरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देताना समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी स्थानिक रहीवाशांच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे जाहिर आभार मानले आहेत.