
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने वाशी येथे गरजूंना ब्लॅकेट व खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले.नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुबिन थॉमस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वाशी सेक्टर ३० व वाशी उड्डाणपुलाखाली वास्तव्यास असणाऱ्या ८५ गरजूंना ब्लॅंकेट व खाद्यपदार्थ देण्यात आले.यावेळी गरजू नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. यावेळी प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजीत शिवरकर, प्रदेश प्रवक्ता आनंद सिंग, सहसचिव भारती अनारे , प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस चंद्रकला नायडू ,चिटणीस कविता कटकधोंड, नवी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा उज्ज्वला साळवे, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस पुजा जैन, सिंथिया घोडके, सिमा घनाटे, आरती कुमावत, सुरज देसाई, धवल लिंबाड, अजय डोमोकोंडा, सर्वेश दुबे, सुमित कुमार सिंह, शिराज सय्यद, सुधाकर भकत, मुन्ना खान तसेच आयोजक सुबिन थॉमस उपस्थित होते.