
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : सारसोळे गावच्या प्रवेशद्वाराच्या उभारणीच्या कामास कै. बुध्या बाळ्या वैती मार्गाच्या सुरूवातीलाच शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी शुभारंभ झाला आहे. यावेळी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर उपस्थित होते. सारसोळे गावाच्या सुरूवातीलाच प्रवेशद्वार असावे यासाठी मनोज मेहेर गेल्या काही वर्षापासून महापालिका आयुक्त, महापौर, विभाग अधिकारी कार्यालय तसेच लोकनेते ना. गणेश नाईकांचा जनता दरबार या ठिकाणीही सतत पाठपुरावा करत होते.
सारसोळे गावचा भुमीपुत्र म्हणून प्रवेशद्वाराच्या माध्यमातून या विकसित शहरांमध्ये गावांची ओळख असावी या भूमिकेतून मनोज मेहेर हे गेली काही वर्षे पाठपुरावा करत होते. महापालिका ब प्रभाग समिती सदस्य म्हणूनही त्यांनी या विषयाकडे सतत प्रशासनाचे लक्ष वेधून घेत होते. महापौर , महापालिका आयुक्त, नेरूळ विभाग कार्यालयातही मनोज मेहेर यांनी लेखी पाठपुरावा कायम ठेवला होता. लोकनेते गणेश नाईक पालकमंत्री असताना मनोज मेहेर यांनी याच विषयावर अनेक लेखी निवेदने सादर करताना या मागणीकडे गणेश नाईकांचे लक्ष वेधले होते.
महापालिका प्रशासनाने नेरूळ नोडमधील गावाच्या प्रवेशद्वाराच्या कामांना मंजुरी मिळविली आणि कोरोनाचा उद्रेक झाला. या पार्श्वभूमीवर सारसोळे गावातील प्रवेशद्वाराचे काम रखडले. मात्र कोरोना काळातही अन्य गावातील प्रवेशद्वाराचे काम सुरू असतानाही सारसोळे गावच्या प्रवेशद्वार कामास विलंब का अशी विचारणा करत मनोज मेहेर यांनी कामाला सुरूवात न झाल्यास सारसोळे गावच्या ग्रामस्थांसमवेत बुध्या बाळ्या वैती मार्गावरच एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मनोज मेहेर यांनी दिला. मनोज मेहेर यांनी इशारा दिल्यावर पालिका प्रशासनाकडून तात्काळ सारसोळे गावच्या प्रवेशद्वाराचे काम शनिवारी सकाळी सुरू केले. गेली अनेक वर्षे जनता दरबार, महापौर, आयुक्त, प्रभाग समितीच्या बैठका व अन्य प्रशासकीय ठिकाणी मनोज मेहेर पाठपुरावा करत असल्याचे सारसोळे गावच्या ग्रामस्थांना माहिती असल्याने हे मनोज मेहेरमुळेच मार्गी लागले असल्याचे सारसोळे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.