• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 21, 2020

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहा; उद्धव ठाकरे

adminbyadmin
in Uncategorized
0
‘जगाकडून कौतूक पण आता आणखी कसोटी, गाफील राहू नका’ :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने मिशन मुंबईची घोषणा केली आहे. काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार सुरू केला आहे. त्याचवेळी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिेले आहे. एकेकाळी मित्रपक्ष असलेला भाजपा शिवसेनेचा वैरी बनला आहे. भाजपाने मिशन मुंबईची घोषणा करताच शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगला येथे बैठक घेतली. या बैठकीत पालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. विरोधक काय बोलतात त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले. कोरोनाच्या काळात नागरी कामे करता आली नाहीत. पण आता कोणतेही संकट येवो, स्वतःची काळजी घेत जनतेची कामे करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबई महापालिकेत पंचवीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाने या काळात मित्रपक्षाची भूमिका पार पाडली. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता येताच भाजपाने मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवण्याचा निर्धार केला. मात्र, २०१७ मध्ये पुन्हा पालिकेत शिवसेनेचा महापौर बनला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे भाजपाने राज्यात आणि मुंबई महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांची पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेच्या बांधकाम स्थळांना भेट

Next Post

मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे गाव प्रवेशद्वाराच्या कामाचा शुभारंभ

Next Post
मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे गाव प्रवेशद्वाराच्या कामाचा शुभारंभ

मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे गाव प्रवेशद्वाराच्या कामाचा शुभारंभ

इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त गरजूंना वाशीत युवक कॉंग्रेसकडून ब्लॅंकेट व खाद्य पदार्थाचे वाटप

इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त गरजूंना वाशीत युवक कॉंग्रेसकडून ब्लॅंकेट व खाद्य पदार्थाचे वाटप

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

नेरूळ-जुईनगरमधील महिलांसाठी कॉंग्रेसचे मोफत क्लासेस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com