
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना रूग्णवाढ लक्षात घेता कोविड सेंटरमधील यंत्रणा तयार व सक्षम ठेवा, अशी सुचना लोकनेते व बेलापुरचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला केली आहे.
दिवाळीनंतर कोरोनारूग्ण संख्या वाढीचा धोका लोकनेते आ. गणेश नाईक यांनी व्यक्त केला होता. कोविड सेंटरमधील साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरबेड, वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी, औषधे, उपकरणे असा सर्व आवश्यक गोष्टी सज्ज ठेवाव्यात, असा सल्ला त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर गुरूवारी झालेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत दिला. त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यांना दिली.
माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे प्रथम आमदार व नवी मुंबईचे विकासपवसंदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेेते रविंद्र इथापे, विरोधीपक्षनेते दशरथ भगत आदी या बैठकीस उपस्थित होते. जानेवारी 2021मध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासन घेऊ शकते. तसे झाले तर शाळांचे दरवाजे उघडण्यापूर्वी गेले वर्षभर बंद असलेल्या शाळांच्या इमारती दुरूस्त कराव्यात निर्जंतुकीकरण करून आतील सुविधा अद्ययावत कराव्यात, अशी सुचना लोकनेते आ. गणेश नाईक यांनी केली असता त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
- ‘कोपरखैराणेच्या माता बाल रूग्णालय कामाला गती द्या’
कोपरखैरणे नोडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता बाल रूग्णालयाचे काम सुरू आहे. कामाची गती संथ आहे. कोरोना काळात हे रूग्णालय या नोडमधील रहिवाशांसाठी उपयुक्त ठरणार असल्याने त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून हे रूग्णालय लवकरात लवकर जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी लोकनेेते आ. गणेश नाईक यांनी यावेळी केली. त्यावर या संबंधी अधिकाऱ्यांना सुचना देवू, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
ऐरोली मतदार संघाचे तत्कालिन आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या ऐरोली ते काटई नाका(बदलापूर) या उडडाणपूलावर ऐरोली येथे मुंबईकडून येताना, मुंबईकडे जाताना, काटई कडून येताना आणि काटईकडे जातात चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली होती. लोकनेते आ. गणेश नाईक यांनी अलिकडेच या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या उड्डाणपूलावर नवी मुंबईत प्रवेश देण्याची सुचना केली असता ती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली असली तर महापालिका स्तरावर या दृष्टीने तत्परतेने कारवाई होत नसल्याचे लोकनेते गणेश नाईक यांनी आयुक्त बांगर यांच्या लक्षात आणून दिले. जर वेळेत आपण कार्यवाही केली नाही तर उड्डाण पूल पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईचे मोठे नुकसान होईल, असा इशारा माजी आमदार संदीप नाईक यांनी दिला. त्यावर संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सुचना करण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले.
लोकनेते आ. गणेश नाईक यांची अलिकडेच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली. या बैठकीदरम्यान त्यांनी दिघा इलठणपाडा येथील रेल्वेच्या मालकीचा मोगली डॅम नवी मुुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली असता .रेल्वेमंयांनी ती मागणी मान्य करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरणासंबधी पुढील कार्यवाहीच्या सुचना केल्या. हा डॅम पालिकेच्या ताब्यात आल्यावर त्याची डागडुजी करावी लागणार आहे. त्या ठिकाणी सुशोभिकरण करून पर्यटनस्थळ निर्माण करता येणार आहे. या डॅमच्या रूपाने पालिकेला पाण्याचा एक अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होणार आहे. डॅम रेल्वेकडून पालिकेकडे घेण्यासंबधी पालिका स्तरावर देखील पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा लोकनेते आ. गणेश नाईक यांनी व्यक्त केली असता आयुक्त बांगर यांनी त्यास होकार दर्शवला. - मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण
मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण कोरोना आढावा बैठकीनंतर लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते रक्तदाब, मधुमेह आदी तपासण्या करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. ही व्हॅन ऐरोली विधानसभा मतदार संघात फिरून आरोग्य तपासणीची सुविधा जनतेला देणार आहे. - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला गती देण्याची माग्ाणी
महापालिकेच्या माध्यमातून ऐरोलीत बांधण्यात आलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेली काही वर्षे सुरूच आहे. ते पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. संविधानदिनी लोकनेते आ. गणेश नाईक यांनी स्मारकाच्या विषयाला चालना दिली. आजपर्यतच्या कामाचा अहवाल मागवून स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्याचा मनोदय आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.शहरातील पालिकेच्या अनेक समाजमंदिरांमधून सध्या कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. मात्र त्यामधून होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ही समाजमंदिरे नागरिकांकरीता सामाजिक कार्यासाठी खुली करावीत, अशी लोकप्रतिनिधींची मागणी असल्याचे लोकनेते आ.नाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता पुढील काही दिवस थांबू. कोरोना आटोक्यात आला तर ही समाजमंदिरे खुली करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. - होल्डिंग पॉडच्या स्वच्छतेचा विषय
नवी मुंबईतील पुरजन्य परिस्थीित टाळण्यासाठी न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवतं होल्डिंग पाँडच्या सफाईचा विषय लोकनेते आ. गणेश नाईक यांनी आयुक्तांच्या बैठकीत वरचेवर मांडला होता. त्या अनुषंगाने होल्डिंग पॉन्डच्या स्वच्छतेचा वैज्ञानिक प्रस्ताव तयार करण्यात येणार असून तो लवकरच सागरी नियमन प्राधिकरणाकडे मंजूरीसाठी पाठविणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी लोकनेते आ. नाईक यांना दिली.