
नवी मुंबई : कोरोनाचे प्रमाण वाढणार असल्याची व दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात असतानाच नवी मुंबई शहरामध्ये मात्र महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे कोरोना महामारी नियत्रंणात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरूवारी (दि. 26 नोव्हेंबर) नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाचे 151 रूग्ण आढळून आले आहेत. मात्र कोरोनामुळे नवी मुंबईत गुरूवारी दोन रूग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर 94 कोरोनाग्रस्त रूग्ण कोरोनामुक्त होवून आज घरीही परतले आहेत.
गुरूवारी आढळून आलेल्या 151 रूग्णांमध्ये सर्वाधिक 40 रूग्ण बेलापुर विभागातील आहेत. नेरूळ विभागात 29, वाशी विभागात 26, तुर्भे विभागात 19, कोपरखैराणे विभागात 13, घणसोली विभागात 7, ऐरोली विभागात 12 तर दिघा विभागात 5 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.