
नवी मुंबई : निवडणूका येतात आणि जातात, परंतु जनतेची नि:स्वार्थीपणे कामे करण्याचा सेवाभाव मात्र अंगी कायम असणे गरजेचे असून याच जाणिवेतून कोरोनाच्या काळातही गेली आठ महिने मी व माझे कार्यकर्ते दिवस-रात्र जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्यांना प्रामाणिकपणे उत्तरे शोधण्यात व्यस्त असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी नेरुळ येथे गुरूवार (दि. ३ डिसेंबर) केले.
नेरुळ गावातील ए ब्लॉक व बी ब्लॉक मधील मल:निस्सारण वाहिन्या (६६ लंक्ष), व्यायामशाळा (१८ लंक्ष) व बालवाडी व सभागृह तीन मजली (३ कोटी) या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. या प्रसंगी नामदेव भगत बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, प्रभाग ९७चे माजी शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार, शिवसेना उपशहरप्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक व शिवसेना उपशहरप्रमुख सतीश रामाणे, प्रभाग ८६ चे शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर, आकाश ठाकूर, यशवंत ठाकूर, राजेंद्र भगत, दिलीप घरत, रामकृष्ण म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.