• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 4, 2020

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा!: बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in Uncategorized
0

शेतकऱ्यांच्या न्याय-हक्काच्या लढाईत काँग्रेस सदैव तत्पर.

काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाला भरघोस प्रतिसाद.

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी जमलेत. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ‘केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे’, असा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे, सहप्रभारी आशिष दुआ, खासदार कुमार केतकर यांच्यासह आमदार उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आज गुरुवारी राज्यभर आंदोलन केले. जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर हे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले. राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष सातत्याने हे अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आला आहे. या लढाईत पहिल्या दिवसापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतली आहे. भांडवलदारांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र असून शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असेही थोरात म्हणाले.

Previous Post

…आणि रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला! सचिन सावंत

Next Post

वाल्मिकी समाज शिवसेनेच्या पाठी खंबीरपणे उभी राहणार : मुकेश सारवान

Next Post
वाल्मिकी समाज शिवसेनेच्या पाठी खंबीरपणे उभी राहणार : मुकेश सारवान

वाल्मिकी समाज शिवसेनेच्या पाठी खंबीरपणे उभी राहणार : मुकेश सारवान

घाटकोपरमध्ये रास्ता रोको, काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची

घाटकोपरमध्ये रास्ता रोको, काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची

भाजपच्या केंद्र सरकारविरोधात कॉंग्रेसचे रस्त्यावर आंदोलन

भाजपच्या केंद्र सरकारविरोधात कॉंग्रेसचे रस्त्यावर आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com