
घाटकोपर : राज्याच्या विविध भागात विस्तारलेला वाल्मिकी समाज हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहणार असून आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांत वाल्मिकी समाज संघर्ष समितीची भूमिका प्रखर असेल असे वक्तव्य उपेक्षित दलित सामाजिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान यांनी भांडुप येथे वाल्मिकी समाज संघर्ष समिती आयोजित उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या सत्कार समारंभात बोलताना केले.
उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या मुंबई महामंत्री पदी सुरेंद्र लोहट यांची नियुक्ती करण्यात आली. वाल्मिकी समाज संघर्ष समितीच्या वतीने सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान यांच्या हस्ते सुरेंद्र लोहट यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र मोकल , वकील फकिरचंद वाल्मिक , सिकंदर मर्दाने , आदी उपस्थित होते. यावेळी मुकेश सारवान परिषदेला उदबोधन करताना म्हणाले की वाल्मिकी समाजाने आता राज्य व देशपातळीवर सामाजिक धुरा पार पाडण्यासाठी नेतृत्व करण्याचा विडा उचलला आहे . आगामी निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी वाल्मिकी समाज ताकदीने उतरणार . यावेळी मुंबई महामंत्री सुरेंद्र लोहट म्हणाले की उपेक्षित दलित सामाजिक परिषदेवर माझी नियुक्ती झाली हा केवळ आनंद नसून माझ्या कामाचा सत्कार आहे. आता याहून समाजाच्या न्याय हक्कासाठी मी स्वतःला झोकून देईल. शिवसेना हा न्याय देणारा पक्ष असून वाल्मिकी समाजाच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील असा विश्वास असल्याचे सुरेंद्र लोहट म्हणाले.